जळगाव शहर पोलीस स्टेशन ची देह व्यवसायावर मोठी कार्यवाही : नागरिकांनी केले समाधान व्यक्त
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या पथकाने अतिशय कुशलतेने सापळा यशस्वी केला
जळगाव : शहरातील भर वस्तीत सुरु असलेला देह व्यापारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते. याची गुप्त माहिती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या परवानगीने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे पथक नेमून कार्यवाहीचे आदेश दिले.
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या पथकाने अतिशय कुशलतेने हा सापळा यशस्वी केला. यात त्यांनी जिथे हा देह व्यापार सुरु होता त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची खात्री करून घेतली. त्यानंतर पाठवलेल्या बनावट ग्राहकाने जवळ च असलेल्या पथकाला व्यवसाय सुरु असल्याचा संकेत दिला. संकेत मिळाल्याबरोबर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व त्यांच्या पथकाने धाड टाकून व्यवसाय चालक व देह व्यापार करणारा महिला व ग्राहक यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर स्त्रीचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
\