माझी शाळा स्वच्छ ठेवणे हे माझे प्रथम कर्तव्य ; माळी सागज येथील मुख्याध्यापक अर्जुन करंकाळे
माळी सागज : येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक स्वतः यांनी आपल्या शाळेची घरच्यांसारखी काळजी घेत झाडलोट केरकचरा एका ठिकाणी जमा करून जाळपोळ केली.
पत्रकारांशी चर्चा करत असताना करंकाळे म्हणाले की, माझी शाळा ही स्वच्छ शाळा असायला पाहिजे यामध्ये माझ्या पूर्ण शिक्षक वृंदावनांचा सहभाग नेहमीच असतो. मी जरी मुख्याध्यापक असलो तरीही मला या कामाचा कुठलाही कमीपणा वाटत नाही. शाळा स्वच्छ असल्यास मुलांचे व शिक्षकांचे मन प्रसन्न असते. त्यामुळे आम्ही पूर्ण शिक्षक वृन्दावन नेहमी शाळा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो व आमची शाळा ही निसर्गरम्य शाळा आहे. येथे झाडेझुडपे खूप आहे त्यामुळे मुलांना खेळायला बागडायला खूप छान वाटते म्हणून आम्ही पूर्ण शिक्षक शाळा स्वच्छ ठेवण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करतो. यामध्ये पूर्ण शिक्षकांचा सहभाग नेहमी असतो, असं ते म्हणाले.
तसेच शिक्षक गवळी बी ए पैठणकर, एस एस घोरड, व्ही व्ही चकवी, आर बी आमटे, एस पी शेळके, डी बडे बहिरम अशा या शिक्षकांच्या एकजुटीमुळे आमची शाळा स्वच्छ शाळा असा आमचा निश्चय आहे. व असा निश्च इतर शाळांनी सुद्धा करावा असे मुख्याध्यापक अर्जुन करंकाळे म्हणाले व गावकरी ही बोललेत की या शाळेचा आदर्श घेण्यासारखा आहे.