पिंपळदरी येथील सर्व रोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सिल्लोड (विवेक महाजन) उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळदरी ता. सिल्लोड येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते रविवार संपन्न झाले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, अशोक सूर्यवंशी, कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, सरपंच सुरय्या तडवी, उपसरपंच किशोर कळवत्रे, अजिंठा येथील माजी सरपंच अब्दुल अजीज, सय्यद नासेर हुसेन आदींची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टिकोनातून आयोजित सर्वरोग शिबिरातून गरजूंना निश्चितपणे लाभ मिळेल. कोरोना सारख्या संकटात डॉक्टर आपल्या दारी अभियानात डॉक्टरांनी घरोघरी जावून नागरिकांच्या तपासण्या केल्या. कोरोनाच्या संकटातील डॉक्टरांचे योगदान महत्वाचे होते असे प्रतिपादन करीत सामाजिक कार्यात सिल्लोडच्या डॉक्टरांचा नेहमी सहभाग असतो. आयोजित सर्वरोग निदान शिबिरात डॉक्टरांनी मोफत सेवा दिल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी डॉक्टरांचे आभार मानले.
या शिबिरात ४०० जणांची तपासणी करण्यात आली. यात ईसीजी, मधुमेह यासारख्या तपासण्या करण्यात आल्या. तपासणी अंती रुग्णांना औशोधोपचार देण्यात आला. या शिबिरात डॉ. मीरा जाधव, डॉ. सचिन जाधव, डॉ. गणेश सपकाळ, डॉ. पूजा कोहकड, डॉ. वैभव नलावडे, द्वारका सागरे, विनोद लांडगे आदींनी सहभाग घेवून रुग्णाची तपासणी केली. शिबिरास यशस्वी करण्यासाठी येथील नॅशनल शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.