शिंदखेडा मिराबाई गल्स हायस्कूल येथे रामानुजन जयंती साजरी
रामानुजन यांचे संधोधनाचे कार्य सर्वासाठी प्रेरणादायी प्रा.गजानन शास्त्री यांचे प्रतिपादन
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील मिराबाई गल्स हायस्कूल मध्ये रामानुजन जयंती साजरी करण्यात आली. याप्रंसगी सेवानिवृत्त प्रा.गजानन शास्त्री यांनी प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिपक माळी यांनी भुषविले.

प्रास्तविक व सुत्रसंचलन एस.जी.शिंपी यांनी केले.तसेच विद्यार्थीनी मधुन समता भावसिंग गिरासे (9 वी) हिने आपल्या मनोगतात रामानुजन हयांच्या काही आठवणीना उजाळा दिला. त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते सेवानिवृत्त प्रा.गजानन शास्त्री यांनी रामानुजन यांच्या जिवनातील बरेच आठवणी सांगत केवळ ३३ वर्ष आयुष्य जगून श्रीनिवास रामानुजन यांचे जीवन चरित्र व संशोधन विद्यार्थीसह सर्वाना प्रेरणादायी आहे. रामानुजन हे सातव्या वर्गात असताना काही गणिती संशोधनाची चुनूक दाखवली. तामिळनाडु तील लहानशा खेड्यात जन्मलेला बालक थेट लंडन ला जाऊन प्रा.हार्डीसारख्या संशोधनाला आश्चर्य चकित केले. याबाबतीत उत्कंठा वर्धक माहिती देत विद्यार्थीनीना हेरुन ठेवले. याप्रसंगी मुख्याध्यापक दिपक माळी यांनी प्रा शास्त्री यांचे स्वागत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. के.एन.परदेशी यांनी आभार मानले.



