महाराष्ट्रराजकीय

आमदार मंगेश चव्हाण यांनी पुरग्रस्तांचा प्रश्न विधानसभेत मांडला

मुंबई (प्रतिनिधी) आमदार मंगेश चव्हाण यांनी आज चाळीसगाव तालुक्यातील पुरग्रस्तांचा प्रश्न विधानसभेत मांडला.

५ महापुरांचा फटका सहन करणाऱ्या चाळीसगांव तालुक्यातील पूरग्रस्तांचा आवाज आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडला हजारो गुरे वाहून गेली, शेकडो घरे उजाडली मात्र चाळीसगांव पूरग्रस्तांना अजून एक रुपयाची मदत मिळाली नाही, आमच्या तालुक्याला तात्काळ कोकणच्या धर्तीवर मदत करा. शेती, गुरे आणि घरांच्या हानीचा एकत्रित विचार करून कशी मदत करणार आहात ते सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली. त्यावर कोकण – पश्चिम महाराष्ट्राच्या निकषाप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याचे आश्वासन त्यांच्या या प्रश्नावर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे