महाराष्ट्र
कैलास वासी संतोषशेठ धनगर यांचे स्मृतिदिनी संस्कार मतिमंद बालगृहात फळवाटप
शिंदखेडा (प्रतिनिधी) तालुक्यातील चिरडे येथील धनगर समाजातील प्रतिष्ठित नागरिक कैलासवासी संतोष शेठ गोवा यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कन्या छायाताई व जावई दत्तात्रेय निळे यांनी धुळे येथील यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ संचालित श्री संस्कार मतिमंद मुलींची शाळा व बालगृह येथील मुलींना फळवाटप करून स्मृतिदिन साजरा केला.
शाळेतील स्वर्गीय दादासो भालचंद्र नथू वाघ, सभागृहातील कौटुंबिक कार्यक्रमासाठी धनगर समाजाचे नेते सुनील भाऊ वाघ, पत्रकार सतीश पेंढारकर, कै. संतोष शेठ यांच्या कन्या छाया जावई, दत्तात्रेय निळे, नातू सुशांत, नात कुमारी संजना, शाळेतील शिक्षिका वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.



