महाराष्ट्र

शिंदखेडा येथील अपर तहसीलदार सुदाम महाजन यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम

तालुक्यात सेवा बजावत असतांनाच पाच नवरांचा सांभाळ केला : सुदाम महाजन

शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील तहसील कार्यालयात शिंदखेडा तहसील कार्यालयात तसेच दोंडाईचा येथे अप्पर तहसीलदार म्हणुन सेवा देणारे सुदाम महाजन यांचा सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रम शिरपूर येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून ह्यावेळी तहसीलदार सुनील सैदाणे, शिरपूर तहसीलदार आबा महाजन उपस्थित होते.

प्रदीर्घ काळ शिंदखेडा तहसील कार्यालयात तहसीलदार तसेच दोंडाईचा येथील अप्पर तहसीलदार म्हणुन उत्कृष्ट सेवा देणारे सुदाम महाजन यांचा तहसील कार्यालयात सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रम संपन्न झाला असून सर्वच मान्यवरांनी सुदाम महाजन यांचा गौरव केला. ह्यावेळी सुदाम महाजन यांनी नेहमीप्रमाणे विनोदी शैलीत आपल्या सेवेतील अनुभव व विद्यमान अधिकारी व कर्मचारी यांना सेवा करत असतांना चढ उतार येत असतात त्यावर योग्य ती काळजी घेऊनच जनतेची सेवा करावी म्हणजे चांगले दिवस पाहायला मिळतात. नांदगाव येथील इंधनाबाबत जनजागृती तसेच शिंदखेडा तालुक्यात कोरोणा महामारीत स्वत कवितेच्या माध्यमातून घराघरात जाऊन जनजागृती केली होती. त्याच बरोबर नोकरी सांभाळून पाच नवरे लाभले त्यांचा व्यवस्थितपणे सांंभाळ केला. त्याचा आपल्या विनोदी शैलीत उल्लेख करून देण्यात आला त्यात पहिला नवरा वरीष्ठ अधिकारी, कि मी माझ्या सेवा कारकीर्द मध्ये आदेशाचे पालन व आदर्श घेत राहिलो.दुसरा नवरा माझे आॅफीस स्टाॅप होता त्यांना ही सांभाळत सेवेचे महत्त्व पटवून दिले.

तिसरा नवरा म्हणजे राजकारण यात नेहमीच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मध्ये समज गैरसमज दूर होतील हे पाहून योग्य ती भूमिका निभावली.चौथा नवरा म्हणजे पत्रकार तालुक्यातील नव्हे तिथेही सेवा केली तिथे जाऊन पत्रकारांशी सलोखा निर्माण झाला. मी कुठे चुकलो असेल तर माझ्या विरोधात ही छापायला हयगय करू नका असेही त्यांनी सांगितले. तिसरा डोळा असलेला पत्रकाराला चांगले व वाईट दोन्ही बाजू दिसतात.म्हणुन सांभाळून राहावे असे सांगत आपण चांगले काम केले तर त्याला न्याय निश्चितच दिला जातो.आणि पाचवा नवरा म्हणजे सर्वसामान्य जनता होता मी सेवा काळात हया वर्गाला अपेक्षित काय होते ते जनजागृती माध्यमातून प्रथम मी केले.निश्चितच प्रत्येक घटकांच्या सुखदुःखात सामील झालो. आणि न्याय देण्यासाठी प्रयत्न केला.शेवटी सेवा करित असतांनाच सर्वसामान्य जनतेच्या आधारावर आपण पोट भरतो त्यांच्याच चांगल्या आशिर्वादाने नोकरी साबुत असते तसे मी केले म्हणून आज सहिसलामत बाहेर पडलो.आपणही तसेच करावे आपल्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा असाही सल्ला दिला. नेहमीच्या विनोदी शैलीत आपल्या भाषणातून सभागृह खदखदून हासत होता.

यावेळी शिरपूर येथील उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, शिरपूर तहसीलदार आबा महाजन, शिंदखेडा तहसीलदार सुनील सैदाणे, नायब तहसीलदार बन्सीलाल वाडिले, गणेश पिंगळे, एस.बी.राणे, सुदाम वळवी, संजय शिंदे, मंडळाधिकारी आर.एच.कोळी शिंदखेडा, संजय जगताप वर्षी , तलाठी शिंदखेडा तुषार पवार, मनोहर पाटील कोळदे, नांदगाव येथील अशोक सिलावट,ममता ठाकरे सह दोंडाईचा व शिंदखेडा तहसील कार्यालयाचे व महसूल विभाग अधिकारी, कर्मचारी, मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक हयासह सामाजिक, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.तसेच दोंडाईचा येथील मंडळाधिकारी एस.एस.पाटील हे देखील सेवानिवृत्त झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.सुत्रसंचलन अर्चना पौर तलाठी यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे