धुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रमुखांनी केला औरंगाबाद येथे कॉरिडॉर पाहणी दौरा
औरंगाबाद कॉरिडॉरचा पाहणी दौरा धुळ्यातील काम लवकर सुरू व्हावे हीच अपेक्षा
धुळे (प्रतिनिधी) धुळे जिल्हा कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीच्या वतीने काल रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौऱ्यासाठी औरंगाबाद येथे एक जम्बो टीम रवाना झाली. सदर अभ्यास दौऱ्याच्या गाड्यांना रणजीत राजे भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. औरंगाबाद येथील कॉरिडॉर DMIC प्रकल्पाचा पाहणी अभ्यास दौरा करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पत्रकार, उद्योजक, व्यापारी, व्यवसायिक, राजकिय, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी तसेच कॉरिडॉर विकास समितीचे सदस्य यांचा समावेश होता.
सदर पाहणी व अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश म्हणजे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाचे काम औरंगाबाद मध्ये कशाप्रकारे सुरू आहे? त्या प्रकल्पामुळे औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाला कशी चालना मिळाली? जिल्ह्यातील किती तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या? हे पाहणे होते. सदर प्रकल्पाच्या ठिकाणी या टीमने भेट घेऊन सविस्तर पाहणी केली. आशिया खंडातील सर्वात मोठे औरंगाबाद DMIC चे कार्यालय येथे भेट देऊन त्या ठिकाणी त्या प्रकल्पाचे दिपक मुरलीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे दिल्ली-मुंबई कॉरिडॉर अंतर्गत औरंगाबाद येथे देश-विदेशातून उभारलेल्या उद्योग व कंपन्यांची माहिती दिली. तसेच या प्रकल्पामुळे किती रोजगार मिळाला याची सविस्तर माहिती मिळाली. त्याच प्रमाणे डीएमआयसी अंतर्गत उभारलेल्या सहापदरी रस्ते, वाय फाय, संपूर्ण शहरात उभारलेले सीसीटीव्ही कंट्रोल रूम, पाण्याची व्यवस्था, बाग बगीचा गार्डन, रहिवासी क्षेत्र तसेच नवीन दोन लाख लोकसंख्येचे निर्माण होणार स्मार्ट सिटी याची सविस्तर पाहणी करून माहिती घेतली.
त्याचप्रमाणे जपान, चीन, दक्षिण कोरिया, रशिया इत्यादी देशांनी या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे त्याची सविस्तर माहिती घेतली. त्याच प्रमाणे संपूर्ण बावीस एकर क्षेत्रातील कामाची दिवसभर पाहणी केली. शहराच्या ठिकाणी उभारलेले किओस सुविधा म्हणजे मदत केंद्र एक अद्भुत कल्पना त्या ठिकाणी दिसून आलेली होती. ज्याप्रमाणे औरंगाबाद मध्ये कॉरिडोर DMIC चे काम सुरू आहे त्याचप्रमाणे धुळ्यात सदर काम सुरू झाल्यास धुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी संधी मिळेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. औरंगाबाद येथील काम हे दहा हजार एकर वर असून धुळ्यातील कॉरिडॉर DMIC चे काम जवळपास पंधरा हजार एकरवर प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील जवळपास एक लाख लोकांना नवीन नोकऱ्या व रोजगाराची संधी मिळणार आहे. ह्या प्रकल्पाचा अभ्यास करून धुळे जिल्ह्यातील प्रकल्पाला चालना द्यावी धुळ्यातील प्रकल्प लवकर सुरू व्हावा यासाठी दबाव गट तयार करून कसे काम करता येईल. याबाबतही सर्वांमध्ये चर्चा करण्यात आली. या प्रकल्पाच्या बाबतीत अभ्यास दौऱ्यातील टीम मधील सर्व सदस्यांनी मनोगत व्यक्त करून हा प्रकल्प अतिशय योग्य असून या प्रकल्पामुळे धुळ्यातील विकासाला चालना मिळेल तरुणांना रोजगार मिळेल व्यवसायिकांना संधी मिळेल असा आशावाद सर्वांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या पाहणी मुळे सर्वांनी समाधान व्यक्त केलं आणि डीएमआयसी काम धुळ्यात लवकर सुरू व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असं याठिकाणी ठरले.
या अभ्यास दौऱ्यामध्ये व पाहणी दौऱ्यामध्ये धुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. यामध्ये नितीन बंग, रणजित राजे भोसले, वर्धमान संघवी, कमर शेख, नरेंद्र अहिरे, अब्दुल आहद, जुबेर शेख, प्रसाद देशमुख, हर्षल परदेशी, संतोष ताडे, निलेश भंडारी, पी.सी.पाटील, राशिद अन्सारी, आताऊ रहमान, राजेंद्र खैरनार, महेंद्र शिरसाठ, श्याम भामरे, हरिष शेलार, विजय पाटील, दत्तू पाटील, राजू रुस्तम, आलमगीर टेलर, नरेंद्र अहिरे, रईंस काझी, चिंतन ठाकूर, नरेंद्र हिरे, विजय पाटील, कृष्णा गवळी, दीपक देसले, अजय पाटील, दत्तू पाटील, विशाल पाटील, मनोज घोडके, प्रकाश शिरसाठ, सुनील निकम, सिद्धांत बागुल, पवन मराठे, किरण पाटील, सचिन मोरे, प्रफुल्ल पवार आदींचा समावेश यामध्ये होता सर्व या दौऱ्यामध्ये सर्व पक्षीय सर्व जातीय सर्वधर्मीय लोकांचा समावेश करण्यात आलेला होता सदर अभ्यास दौरा अतिशय यशस्वी रित्या पूर्ण झाला.
या प्रकल्पामुळे धुळ्याचा आणि परिसराचा कायापालट होईल यात काहीच वाद नाही लाखो लोकांना रोजगार मिळेल या प्रकल्पासाठी आपण सगळे धुळेकरांनी समस्त लोकांनी यांना प्रयत्न करणाऱ्या या लोकांना सहकार्य करावं
नितीन बंग, (उद्योजक)
समाजातील सर्व घटकातील लोकांना एकत्र घेऊन हा जो अभ्यास दौरा आज करण्यात आला अतिशय चांगला उपक्रम रणजीत राजे भोसले यांनी राबवला. गेल्या अनेक वर्षापासून रंजीत राजे धुळे कॉरिडॉरसाठी का प्रयत्न करतायेत हे आज आम्हाला कळले. आमच्या पक्षाच्या संकल्पना,विचारधारा जरी वेगळ्या असल्या तरी धुळे जिल्ह्याच्या विकासाच्या कामात आम्ही नेहमी त्यांच्यासोबत सोबत राहू.
प्रसाद देशमुख, (मनसे जिल्हा प्रमुख)