गुन्हेगारी

धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध विदेशी दारु वाहतुक करणारा ट्रक पकडला !

धुळे (करण ठाकरे) धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध विदेशी दारु वाहतुक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला असून ५० लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत वृत्त असे की, दि. २८/०१/२०२२ रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, ट्रक क्र.एम.पी.०९ एच.एफ. ९९९१ यामध्ये अवैधरित्या मध्यप्रदेश येथील खलघाट येथून विदेशी दारुचे बॉक्स भरलेले असून त्याची नवापुर जि.नंदुरबार येथे चोरटी वाहतुक केली जाणार आहे. अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भुषण कोते, पोलीस उप निरीक्षक सागर काळे, पोहेको प्रविण पाटील, पोहेकॉ सोमनाथ कांबळे, पोना योगेश पाटील, पोकों कुणाल शिगाणे, पोकों धिरज सांगळे, पोकों भुषण पाटील, पोकों प्रमोद पाटील, पोकॉ योगेश पाटील, चालक पोना प्रकाश भावसार अशांनी पंचासह सापळा रचून बातमीतील वाहनाचा मुकटी परिसरात शोध घेतला असता हॉटेल करणी येथे सकाळी ०५.०० वा.चे सुमारास सदरचा बामतील ट्रक मिळून आला. त्यावर वाहन चालक पप्पुसिंग रघुनाथसिंग दोडीया (वय ३५ रा.उनी ता. जावरा जि. रतलाम, मध्यप्रदेश) हा मिळून आला व सदर वाहनात ऑल सिझन्स कंपनीची विदेशी दारुचे एकूण २५५ बॉक्स असा माल मिळून आला, तसेच सदर ट्रकची वाहतूक करण्यासाठी सहाय्य करणारे स्कार्पीओ वाहन क्र.जी.जे.०६ सौ.एफ. २१३३ हे व त्यावर तौसीमोद्दीन रशीदरभाई शेख उमेश दुर्गादास बसावा दोघे रा. नवापुर जि.नंदुरबार हे मिळून आले.

सदर ठिकाणी मिळून आलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे आहे.
१) ३२,७४,०००/- रुकिंची ऑल सिझन्स कंपनीची गोल्डन कलेक्शन रिझर्व व्हिस्की विदेशी दारु एकूण २५५ बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये ७५० मिली क्षमतेच्या १२ सोलबंद बाटल्या
२) १०,००,०००/- रुकिं. ची ट्क क्र. एम. पी.०९ एच.एफ. ९९९९ कं.ची
३) ८,००,०००/- रुकिं. ची स्कार्पीओ क्र.जी.जे.०६ सी.एफ. २१३३
एकूण ५०,७४,०००/

सदरची महाराष्ट्र राज्यात बंदी असलेली विदेशी दारु ही मध्यप्रदेश येथून नवापुर येथे पिंटू उर्फ गोरख भिमराव गढरी रा. नवापुर याचेकडे अवैध विक्रीसाठी वाहतुक करून घेवून जात होते. असे निष्पन्न झालेले आहे. सदर बाबत दारू पुरवठा करणारे, वाहतुक करणारे सहाय्य करणारे व माल घेणारा अशा एकूण ६ इसमांविरुध्द गुन्हा क्र.५५/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी का. क.६५ (ई). (अ). ८०(२) (४) ८३.२०८ अन्वये नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री प्रदीप मैराळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोहेका प्रविण पाटील, पोहेका सोमनाथ कांबळे, पोना योगेश पाटील, पोकाँ कुणाल शिगाणे, पोका धिरज सांगळे, पोका भुषण पाटील, पोकॉ प्रमोद पाटील, पोकों योगेश पाटील, चालक पोना प्रकाश भावसार यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे