बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
या शपथविधीच्या कार्यक्रमाला भाजपचे काही नेते, पत्रकार उपस्थित होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दीघे साहेब, मी एकनाथ संभाजी शिंदे इश्वरसाक्षी शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा राखील. मी भारताची सार्वभौमत्वा आणि एकात्मता राखीन. मी महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडेन. संविधान आणि कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे, तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन”, अशी शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली.