शिधापत्रिका ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी घातलेल्या जाचक अटी रद्द करा – आमदार फारूक शाह यांचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनजी भुजबळ यांना निवेदन.
जाचक अटी शिथिल करून शिधापत्रिका ऑनलाईन नोंदणी आणि अन्न धान्य देण्याचे मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनजी भुजबळ यांचे आमदार फारूक शाह यांना आश्वासन.
धुळे : शहरात सर्वसाधारण नागरिकांच्या शिधापत्रिका ऑनलाईन न झाल्याने अनेक नागरिकांच्या शिधापत्रिकेवर अन्न धान्य मिळत नसून यामुळे सर्व साधारण आणि गरीब गरजू नागरिक अन्न, धान्यापासून वंचित राहिलेली आहे. त्यातच शिधापत्रिका ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी जाचक अटी टाकल्याने नागरिकांच्या शिधापत्रिका ऑनलाईन होत नाही. धुळे जिल्हा व धुळे शहर बेरोजगारीने ग्रस्त असल्यामुळे या भागातील वाढती लोकसंख्या बघता आपण आपल्या स्तरावर शासनाच्या धोरणाप्रमाणे गोर-गरीब नागरिकांना अन्न धान्याचा लाभ मिळवून देण्याकरिता शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठीच्या दिलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांनी आमदार फारूक शाह यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. सदरची बाब अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनजी भुजबळ यांना आमदार फारूक शाह यांनी लक्षात आणून देत लेखी निवेदन सादर केले. तसेच धुळे शहरात सर्वसाधारण नागरिकांच्या शिधापत्रिकेवर अन्न धान्य पूर्ववत मिळण्यासाठी आणि शिधापत्रिका ऑनलाईन होण्यासाठी घातलेल्या जाचक अटी तात्काळ रद्द करून त्यांना लवकरात लवकर शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासंदर्भात धुळे जिल्हा पुरवठा विभागाला आदेशित करावे असे निवेदन सादर केले. याला उत्तर देतांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनजी भुजबळ यांनी विनंती मान्य करत जाचक अटी शिथिल करण्यात येत असल्याचे आश्वासन दिले आणि सर्वच पात्र शिधापत्रिका धारकांना लवकरात लवकर अन्न धान्य मिळेल असे सांगितले. आमदार फारूक शाह यांनी सर्व सामान्य तसेच गरीब व गरजू नागरीकांचे प्रश्न सातत्याने मुंबईत वरिष्ठ स्तरावर लावून धरले आहेत. यामुळे सर्वत्र चर्चा सुरु असून कामांचे कौतुक होत