- शिंदाड ता.पाचोरा येथे दि 26 नोव्हेंबर2021 रोजी समाज मंदिर वाणेगांव येथे पोलीस पाटील कार्यालय मार्फत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
या वेळी सरपंच सौ मनिषाताई पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य सौ ज्योतीताई पाटील यांच्या हस्ते संविधान प्रतिमा पुजन करण्यात आले….पोलीस पाटील श्री नितिन जमदाडे यांनी संविधानाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले..यावेळी 26/11 च्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली देण्यात आली. या प्रसंगी सरपंच सौ मनिषा पाटील, सदस्य ज्योती पाटील, सुकदेव आव्हाड, मोतीलाल गायकवाड, राजू खोतकर, समाधान पाटील , प्रकाश पाटील , राजू सिंगारे, समाधान सोनवणे, भिकन पाटील , भुषण पाटील ,पतिंग पाटील,अजय संसारे, अशोक धुरंधरे,मनोज पाटील, अप्सर तडवी, देवाजी सोनवणे, बापू बागूल, छोटू संसारे ,काशिनाथ सिंगारे, आदी मान्यवर उपस्थित होते.पोलीस पाटील नितीन जमदाडे यांनी आभार व्यक्त केले.
बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा