महाराष्ट्र

शिंदखेडा येथे भिल समाज विकास मंचचे चर्चा सत्र संपन्न

संमेलन घेण्यासह विविध विषयांवर चर्चा

शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील जनता हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या नेतृत्वात चर्चा सत्र उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संमेलन घेण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापुजी फुले होते. यावेळी वीर एकलव्यच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रास्तविक व सुत्रसंचलन चंद्रकांत सोनवणे यांनी केले.


यावेळी समाजातील विविध समस्या सोडविण्यात पुढे आलेल्या लढावु कार्यकर्तेचा सन्मान करण्यात आला. चर्चासत्रात शिदखेडा, दोंडाईचा, शिरपूर, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेवून आपले विचार मांडले. प्रमुख मार्गदर्शनामध्ये मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी सांगितले की, भिल समाज विकास मंचच्या वतीने राज्यस्तरीय भिल संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. समाजातील पदाधिकारीचे सहकार्य अपेक्षित आहे. संमेलनाच्या माध्यमातून बर्डे भिल समाज एकत्र करणे. भिल समाजातील लोकांना हक्काचे घर, सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायाला दहा लाख रुपये, शबरी घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजनेतील जाचक अटी रद्द करावे, भिल समाजातील लोकांना आदिवासी विकास विभागाने स्वतंत्र निधी उपलब्ध करावे, पेचा अंतर्गत येणाऱ्या गावाला योग्य न्याय मिळवून द्यावा आदी मागण्यांसह सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी संमेलनाचे आयोजन आहे. याशिवाय आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्त समाज, आर्थिक, स्वावलंबन, जमीन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

शिंदखेडा शहरात वीर एकलव्याचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून त्यासाठी भिल समाज विकास मंच व बहुजन वंचित आघाडीचे नेते इकबाल तेली यांचे योगदान लाभणार आहे. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, शिरपूर तालुका अध्यक्ष भोजु अहिरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक अहिरे, विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल सोनवणे, सरपंच मन्साराम मालचे, न्हानभाऊ सोनवणे, भाऊसाहेब मालचे, श्रीराम मोरे, भटु मालचे, एकनाथ ठाकरे, पांडु मोरे, आबा वाघ, गणेश सोनवणे, राजेश मालचे, कमलेश पाडवी, अर्जुन ठाकरे, संजय वाघ, सुभाष भिल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे