महाराष्ट्र

शिवगर्जना युवा प्रतिष्ठान, (वेताळमाळ) शिवजयंती साजरी करणार विविध उपक्रमांनी

कोल्हापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील शाहूवाडीतील शित्तूर – वारुण येथे प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवजयंती महोत्सव विविध उपक्रम राबवून करणार असल्याचे शरद पाटील, विजय देसाई यांनी सांगितले. शिवरायांचे विचार येणाऱ्या पिढीमध्ये रुजावेत यासाठी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मिडल व उपयुक्त शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून दिले जाईल. सहभागी विद्यार्थ्यांचा ही शैक्षणिक साहित्य देऊन गौरव केला जाईल.

घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा

१. चित्रकला स्पर्धा
विषय-छत्रपती शिवाजी महाराज /महाराजांच्या जीवनातील एखादा प्रसंग
२. निबंध स्पर्धा
विषय-छत्रपती शिवाजी महाराज जीवन व कार्य.
३. वक्तृत्व स्पर्धा/भाषण स्पर्धा
विषय-छत्रपती शिवाजी महाराज-जगण्याची प्रेरणा
४. प्रश्नमंजुषा स्पर्धा(५०गुण/वस्तुनिष्ठ प्रश्न)
विषय-(इयत्ता चौथी पाठपुस्तक आधारित)

वरील सर्व स्पर्धांसाठी तज्ञ परीक्षक परीक्षण करतील. सर्व स्पर्धा पारदर्शकपणे पार पडतील. स्पर्ध्येमध्ये भाग घेण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही असे आयोजकांनी सांगितले व सर्व विध्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे