महाराष्ट्र

राजधानीला ओमिक्रॉनची भीती ; मुख्यमंत्र्यांनी जारी केला यलो अलर्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाची राजधानी नवी दिल्ली लॉकडाउनच्या दिशेने वाटचाल करत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. राजधानी दिल्लीत केजरीवाल सरकारने यलो अलर्ट जारी केला आहे. करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिल्लीत झपाट्याने वाढत असल्याने केजरीवाल सरकारने हे पाऊल उचलले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे ‘दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स अॅक्शन प्लान’ (GRP ) नुसार दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लवकरच सरकार यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

यलो अलर्टनुसार अनेक निर्बंध होतील लागू

यलो अलर्टनुसार दिल्लीत निर्बंध लागू केले जातील. सौम्य लक्षणं आणि संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी व्हेंटिलेटरच्या वापरात कुठलीही वाढ झालेली नाही. तसंच दिल्लीत करोना रुग्णांची संख्या वाढल्या सरकारने आधीपासूनच १० पट तयारी करून ठेवली आहे, असं मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

…या कारणांनी लागू होतो यलो अलर्ट

सलग दोन दिवस संसर्गाचा दर ०.५ टक्के किंवा सलग ७ दिवस १५०० हून अधिक किंवा सरासरी ५०० ऑक्सिजन बेड हॉस्पिटलमध्ये भरलेले असल्यास यलो अलर्ट लागू केला जातो. दिल्लीत ओमिक्रॉनचे एकूण १६० रुग्ण आढळून आले आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे