महाराष्ट्रराजकीय

धुळ्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी काँग्रेसचा स्थापना दिवस व काँग्रेस सेवा दल दिवस साजरा

धुळे (प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस कमिटी काँग्रेसचा स्थापना दिवस व काँग्रेस सेवा दल दिवस धुळ्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. काँग्रेस स्थापना १८८५ पासून झाली असून १३७ वर्ष स्थापनेला झाले तसेच काँग्रेस सेवादलाच्या ही दल दिवस काँग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव यांनी मनोगत व्यक्त केले की काँग्रेसची स्थापना झाल्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळाले पर्यंत काँग्रेसच केलेलं काम तसेच आजपर्यंत काँग्रेसने प्रभावीपणे असे भारताच्या विकासासाठी भारताच्या सुखशांतीसाठी भारताच्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे नमूद केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र खैरनार सेवादल धुळे शहर जिल्हाध्यक्ष यांनी केले.

याप्रसंगी धुळे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील तसेच कार्याध्यक्ष मुजफ्फर भाई हुसेन, महिला आघाडी अध्यक्षा बानू ताई शिरसाट, जिल्हा महिला सेवादल अध्यक्ष सुमन बाई मराठे, भावनाताई गिरासे, शहर महिला काँग्रेस सेवादल अध्यक्ष सुनंदा साळुंके, मीनाताई सोनानिस, सेवादल जिल्हा सेक्रेटरी दीपक पाटील, अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष किरण बापू नगराळे, शहर सेक्रेटरी हरिभाऊ चौधरी, फैजल अन्सारी, जावेद देशमुख, सेवादल उपाध्यक्ष आयुब खाटीक, राष्ट्रीय सफाई कामगार राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराव जावडेकर, अन्सारी विरोधी पक्षनेते साबिर भाई शेख, ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष गोपाल देवरे, सुरेश नाना बैसाणे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच काँग्रेस प्रदेश सचिव युवराज आबा यांच्या हस्ते काँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान फुल पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात बोलताना गोपाल देवरे शहर जिल्हा अध्यक्ष ओबीसी विभाग यांनी म्हटले की १८८५ पासून काँग्रेस स्थापन झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अत्यंत परिश्रम करून अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधीजींनी आपले योगदान दिले. त्यांच्या महान कार्याला त्रिवार मानाचा मुजरा तसेच काँग्रेस पक्षाने व गांधी घराण्याने दिलेले योगदान महान महान असून स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलेले कार्य अतिशय काँग्रेस पक्षाला गर्व वाटेल असा आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर भारताच्या विकासाच्या दृष्टीने अनेक विकास कामे झालीत सत्तर वर्षात काँग्रेसने जी कामे केलीत भविष्यात काँग्रेस पक्ष व्यतिरिक्त कुठलाही पक्ष करू शकत नाही. तसेच इंदिरा आवास योजना अशा बहुतेक योजना त्यांनी राबवल्या भारताच्या औद्योगिक क्षेत्रात विकास त्यांनी केला का असे अनेक उदाहरणे यावेळी त्यांनी बोलून दाखवले. आणि कार्यक्रमाला बहुसंख्य असे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आभार प्रदर्शन धुळे जिल्हा काँग्रेस सेवादलाचे चिटणीस दीपक पाटील यांनी केले

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे