महाराष्ट्र
पत्रकार गजेंद्र पाटलांनी आपल्या मुलांसह चंदनपुरी येथील खंडेराव महाराजांचे मनोभावे घेतले दर्शन
धुळे (प्रतिनिधी) मालेगाव शहरालगत असलेल्या चंदनपुरी गावात सर्वाचे श्रध्दांस्थान असलेले सुप्रसिद्ध खंडेराव महाराजाचे देवस्थान असून त्यांची यात्रा मोठ्या उत्साहात भरत असते. खंडेराव महाराजाचे दर्शन घेण्यांसाठी हजारो भाविक येवून दर्शन घेत असतात.
आज धुळे तालुक्यांतील वरखेडे गावाचे पत्रकार गजेंद्र नारायण पाटील यांनी आपल्या मुलांसह दि. १७ जानेवारी रोजी चंदनपुरी येथे जावून खंडेराव महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यावेळी चंदनपुरी येथील जीवाभावाचे मित्र तेजस पाटील, भुरा पाटील समवेत वरखेडे गावाचे पत्रकार गजेंद्र पाटील, चिरंजीव जयेश गजेंद्र पाटील आदींनी दर्शन घेतले.