सहाय्यक पोलीस अधीक्षकांची चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून साठा करून ठेवलेल्या दोन फार्म हाऊस वर कारवाई
दोन गुन्हे दाखल, ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
चाकूर (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणे प्रमुखांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात चाकुर विभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांना बातमी दाराकडून गोपनीय माहिती मिळाली की चापोली ते नायगाव जाणारे रोड वरील काळे यांचे फार्म मध्ये चंदनाचे झाडांची तोड करून त्यांचा गाभा ठेवलेला आहे.
सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांनी सदरच्या माहितीची शहानिशा करून दिनांक २८/१२/२०२१ रोजी मध्यरात्री पोलिस स्टेशन चाकुर पोलीस अधिकारी अंमलदार व पथकासह नमूद ठिकाणी छापा टाकला. तेव्हा फार्म हाऊस मधील एका खोलीमध्ये चंदन वृक्षाची तोड करून लाकडाची साल काढून तासलेले लाकडे पोत्यांमध्ये भरून लपवून ठेवल्याचे आढळून आले .सदरच्या चंदनाच्या झाडांची वजन केले असता त्यांचे वजन ५०९ किलो भरले त्यांची अंदाजे किंमत १९ लाख रुपये इतकी असून पोलिसांनी पंचनामा करून सदरचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार शिराज शेख यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 568 / 2021 कलम 379, 353, 332, 504, 506, 34 भादवि कलम 41, 42 भारतीय वन अधिनियम 1927 व कलम ०४ महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम प्रमाणे आरोपी नामे १) रामदास शेषराव बुंदराडे, २) महादू शेषराव बुंदराडे, ३) पांडुरंग शेषराव बुंदराडे, ४) तुकाराम शेषराव बुंदराडे सर्व राहणार आनंदवाडी तालुका चाकूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय सदरची कारवाई करीत असताना आरोपीने कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी नमूद गुन्ह्यातील कलम वाढ करण्यात आलेली आहे.
तसेच आणखीन एका फार्महाऊसवर कारवाई करत १०० किलो वजनाचे चंदनाची गाभा व त्या मालाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे पांढरी रंग यांची महिंद्रा स्कॉर्पिओ जीप असा एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असून पोलीस अमलदार पिराजी पुट्टेवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामे १) नरसिंग रामा बुंदराडे (वय ५०), २) नितीन नर्सिंग बुंदराडे (वय २८ रा. आनंदवाडी तालुका चाकूर) यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६७/२१ कलम ३७९, 34 कलम 41 42 भारतीय वन अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद दोन्ही गुन्ह्यात आरोपी नामे १)नर्सिंग रामा बुंदराडे २) नितीन नर्सिंग बुंदराळे यांना अटक करण्यात आले असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अभंग माने, कपिल पाटील, पोलीस अमलदार शिराज शेख, पिराजी पुटेवाड, सूर्यकांत कलमे, हनुमंत मस्के यांनी केली आहे.