महाराष्ट्र

सिल्लोड – भराडी रस्त्यावर भीषण अपघात ; ६ जणांचा मृत्यू

सिल्लोड (विवेक महाजन) आज पहाटे सिल्लोड – भराडी रोडवर मोढा फाटा नजीक भीषण अपघात घडला. या अपघातात ६ जण जागीच ठार झाले तर १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

अपघातग्रस्त हे सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जखमींची भेट घेत घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सतीश ताठे, राजेंद्र ठोंबरे आदींनी जखमींना अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथे जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत जखमींना तात्काळ उपचार मिळवा यासाठी उपाययोजना केल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे