संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव वाणिज्य विभागाअंतर्गत सेमिनार संपन्न
सोयगांव (विवेक महाजन) येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालय वाणिज्य विभाग अंतर्गत सेमिनारचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रमुख मार्गदर्शक सीएमए पराग राणे हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिरीष पवार डॉ. रावसाहेब बारोटे हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचे परिचय प्रा. उमेश वामने यांनी करून दिला वाणिज्य विषयात करिअर संधी या विषयावर मार्गदर्शकाने विद्यार्थ्यांना उद्बोधन करीत असताना कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांना असणाऱ्या विविध संधी व अभ्यासक्रम यावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील सर्व शाखेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रा.निलेश गावडे यांनी मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल मानकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी करीता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.