आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
बळसाणे येथे लसीकरण कॅम्प ; ६०० नागरिकांनी घेतली लस
साक्री (प्रतिनिधी) बळसाणे येथे लसीकरणाचे कॅम्प आयोजित केले होते. या कॅम्पचे उद्घाटन पंचायत समिती सभापती प्रतिभाताई सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी गटविकास अधिकारी जे.टी सूर्यवंशी, पं स सदस्य महावीर जैन, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हितेंद्र गायकवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या बोरसे, विस्तार अधिकारी खाडे नाना आदी उपस्थित होते. यावेळी बळसाणे गावातील ६०० नागरिकांनी लस टोचून घेतली. याकामी डॉ. स्वप्नील भदाणे, डॉ. किरण वाघ, डॉ. दिनेश जाधव, परिचारिका जयश्री सोनवणे, लालसिंग पावरा, प्रेमानंद महाले आशा सेविका कविताताई ससारे, राधाताई खांडेकर, मेघाताई खांडेकर, स्वातीताई पवार यांनी लसीकरण करण्यासाठी परिश्रम घेतले.