शिंदखेडा येथे आदिवासी एकता परिषदेच्या वतीने धरती पुजन व वंचित आदिवासींना शिधा पत्रिका वाटप
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील आदिवासी एकता परिषद वतीने आयोजित समाज नियोजित जागेवर धरती पुजन करण्यात आले. कोरोना महामारीत प्रताडगड राजस्थान मधील महासंमेलन स्थगिती दिली आहे. त्या पाश्वभुमीवर आज पद्धतीने धरती पुजन करून धरती गीत गायिण्यात आले. व आदिवासी वंचित घटकांना मोफत शिधापत्रिका वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्षपदी बाबुआण्णा सोनवणे, देवानंद सोनवणे, सिताराम मालचे, मोतीराम सोनवणे, अशोक महाराज, भिकन महाराज, सुरेश सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे, उपसचिव भुपेंद देवरे, कार्याध्यक्ष दिपक फुले, संपर्क प्रमुख सुरेश मालचे सल्लागार शामभाऊ सोनवणे, आप्पा सोनवणे, एकनाथ फुले, जिभाऊ फुले, सुनिल मोरे, शाखाप्रमुख पंकज फुले, अमर भिल, ईश्वर सोनवणे, रजेसिंग मालचे भुरा सोनवणे, शंकर मोरे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्वविक व सुत्रसंचलन सुरेश सोनवणे यांनी सांगितले की कोरोना महामरीत प्रत्येक समाज बांधवांनी काळजी घ्यावी व आपले कुटुंबातील सदस्य यांच्या आरोग्य ची काळजी घ्यावी व शासनाच्या आदेशानुसार सहकार्य करावे असे आवाहन केले.