पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात भूगोल दिन उत्साहात संपन्न
चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा येथे आज भूगोल विभागामार्फत भूगोल दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. महादेव वाघमोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील (कै.ए. आर. डि. देवरे महाविद्यालय,मस्दी) हे होते.
भूगोल दिन या विषयी माहिती देत असताना भूगोल विषयाचे महत्त्व, जैवविविधता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रोजगाराच्या संधी आणि पर्यावरण इत्यादी विषयांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. महादेव वाघमोडे यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण जनजागृती, आज भूगोल विषयांमध्ये झालेले बदल या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रास्ताविक प्रा. डॉ. नंदिनी वाघ व आभार प्रा. अजय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर बांधव विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.