महाराष्ट्रराजकीय

शिंदखेडा रेल्वे स्थानकावर जलद रेल्वे गाड्यांना थांबा द्या !

भाजप तालुकाध्यक्ष प्रवाशी आघाडी दादा मराठे, गोविंद प्रकाश यांची खा. सुभाष भामरे यांच्याकडे निवेदनातून मागणी

शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा रेल्वे स्थानक हे तालुक्यातील मध्यवर्ती रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावर शिरपूर, सोनगीर, धुळे, नरडणा, चिमठाने अश्या अनेक महत्वाचे शहर आहेत. इतर राज्यात व्यापारी व प्रवाशी प्रवास करण्याकरिता व जाण्या-येण्याकरिता शिंदखेडा रेल्वे स्थानकाहून प्रवास करतात. शिंदखेडा तालुका असून येथे नगरपालिका, तालुका कोर्ट, ४०० मुलामुलींचे निवासी वसतिगृह तालुक्यात सुमारे १४८ खेडे गाव असून तालुक्यातील शिंदखेडा शहर हे मध्यवर्ती शहर असल्याने या शहराशी आणि शिंदखेडा रेल्वेस्थानकाशी ६० ते ७० गावांचा संपर्क नेहमी येत असतो.

शिंदखेडा शहरातील व तालुक्यातील व्यापारी वर्ग नेहमी इतर राज्यात जाण्यासाठी व येण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. पण काही जलद अति जलद रेल्वेना थांबा नसल्याने व्यापार व विकासात कमी पणा येत असतो म्हणून रेल्वे ही एकमेव महत्वाची लाईफ लाईन असून शिंदखेडा रेल्वे स्थानकांवर जलद अति जलद रेल्वे गाड्यांना थांबा देने ही काळाची गरज असून विकासासाठी महत्वाचे आहे. दादा मराठे यांनी खा. डॉ सुभाष भामरे यांची भेट घेतली आणि भागलपूर सुरत भागलपूर, पुरी अहमदाबाद पुरी, बरोनी अहमदाबाद बरोनी या जलद रेल्वेना शिंदखेडा रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा आणि कोरोना काळात बंद असलेली सुरत पैसेजर, भुसावळ सुरत पैसेजर ही पूर्ववत सुरू करावी तसेच खान्देश एक्सप्रेस ही दररोज सुरू करावी. अश्या अनेक विषयाची चर्चा करण्यात आली.

तात्काळ बाबासाहेब यांनी निवेदाची दखल घेऊन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना येत्या सोमवारी निवेदन देणार असून हा विषय येत्या १५ ते २० दिवसात मार्गी लावतो, असे शिंदखेडा शहरातील जनतेनला अश्वांसित केले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेतली म्हणून दादा मराठे, गोविंद प्रकाश यांनी समाधान व शिंदखेडा शहराचा वतीने आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे