महाराष्ट्र
मोफत कोविड लसीकरण शिबिर संपन्न
डोंबिवली (प्रतिनिधी) डोंबिवली पूर्व विभागातील कल्याण-शीळ रोड वरील शंखेश्वर नगर येथे मोफत कोविड लसीकरण शिबिर आज संपन्न झाले. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सहभाग घेऊन शिबीर यशस्वी केले.
मनसे पक्षाचे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारीवली गावाचे माजी सरपंच तथा मनसे डोंबिवली शहराचे शहर संघटक योगेश रोहिदास पाटील तसेच निळजे आरोग्य केंद्र यांच्या वतीने व बबलू मोरे, डॉ. सतिश आंधळे आणी प्रेमनाथ माळोदे यांच्या सहकार्याने आज डोंबिवली पूर्व विभागातील कल्याण-शीळ रोड वरील शंखेश्वर नगर येथे मोफत कोविड लसीकरण शिबिर संपन्न झाले. सदर मोफत कोविड लसीकरण शिबिरामध्ये शंखेश्वर नगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सहभाग घेऊन शिबीर यशस्वी केले.