पहूर केंद्रात शाळापूर्व तयारी मेळाव्यास उदंड प्रतिसाद
'चल चल छकुली शाळेला ' नाटीकेने वेधले लक्ष
पहूर ता. जामनेर (ईश्वर चौधरी) आगामी शैक्षणिक वर्षांत प्रत्येक मूल शाळेत दाखल व्हावं,या ध्येयाने प्रेरित होऊन शाळापूर्व तयारी मेळाव्यांतर्गत पहूर केंद्रात, आज सर्वच जिल्हा, परिषद प्राथमिक शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आले.
मराठी मुलींची व मुलींची शाळा पहूर कसबे येथे इयत्ता पहिलीत ‘.विद्यार्थी दाखल करण्यासाठी “शाळा पूर्व तयारी मेळावा” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात ग्रामस्त, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य, अंगणवाडीताई सेविका व मदतनीस, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने गावातील दाखल पात्र विद्यार्थाचा शोध, घेऊन गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. गावात ठिक ठिकाणी दंवडी देण्यात आली.तसेच गावातील चौकात कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यांनी ऊत्कृष्ट प्रकारे “चल चल छकुली” शाळेला या नाटिकेचे सादरीकरण केले. त्यानंतर शाळेत आलेल्या शाळा व्यवस्था पण समितीचे अध्यक्ष,गुलाब बाविस्कर, दिलीप बावस्कर,सदस्य सरला चंदणकर, ईसा तडवी, प्रतिभा बावस्कर, शिक्षण प्रेमी आनंदा काळे उपस्थित होते.
मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दाखल पात्र विद्यार्थासाठी स्टॉल क्रमांक १ ते ७ पर्यंत विकास पत्र रिपोर्ट कार्डभरून आयडिया कार्डचा वापर करण्यात आला.
सूत्रसंचालन व नाटिकेचे सादरीकरण किर्ती बाबूराव घोंगडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सुनिल कोळी, श्रीकांत पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी बुधवंत, रविंद्र वारे, अश्विनी जाधव, अलका भोंडे, सुनिता बोदडे, सुनिता जाधव, सुनंदा कदम, कल्पना चौधरी, उज्वला जाधव, सखु लहासे, सरला वानखेडे, उर्मिला जाधव, कल्पना चौधरी यांनी सहकार्य केले.