डॉ.अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडलेय ; पंकज मोरेंचा आरोप
अमरावती (पंकज मालवीय) डॉ.अनिल बोंडे यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असून यामुळे त्यांचा स्वतःच्या बोलण्यावर ताबा नसतो. म्हणूनच त्याच्याकडून बेजवाबदर वक्तव्य सातत्याने केली जातात. त्यांच्या या आजारावर इलाज करण्यासाठी अमरावती जिल्हा, युवक काँग्रेस व शहर युवक काँग्रेसच्या हे स्वतः पैसे जमा करून त्यांचा मेंदूचा इलाज व समुपदेशना आज युवक काँग्रेस च्या वतीने डॉ श्रीकांत देशमुख यांच्या हॉस्पिटल मध्ये डॉ. उपचार झाला पाहिजे यासाठी युवक काँग्रेसने आज येथे अभिनव आंदोलन केले.
दंगल भडकविणारे डॉ.बोंडे यांच्या प्रतिमेला जोडे व चपलाने मारहाण करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यापासून ननोव्हेंबर, २०२१ मध्ये झालेल्या दंगल भडकविण्यात आग्रही भूमिका घेणारे माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांची जीभ रोज घसरत आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधात खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. एस टी कर्मचारी यांच्या आंदोलनास चिथावणी, बहुजन ओबीसीं युवकांना हिंदूत्वाच्या मुद्यावर भडकावून जातीय तणाव निर्माण करण्याचे काम भाजप, पक्षाच्या छुप्या एजेंड्यावर ते करत असून त्यांच्या फेसबुक पेजवर चिथावणी देणारे अनेक पोस्ट आहेत.
आज पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरच दंगली भडकविल्या याबाबत बेजबाबदार निराधार आरोप केला असून, त्यांचे हे वक्तव्य मानसिक संतुलन बिघडलेले आहे. असा आरोप युवक काँग्रेसने आज केला व डॉ. बोंडे यांची विकृत प्रकृती सुधारावी अशी प्रार्थना केली. यावेळी भविष्यात असे वक्तव्य केल्यास चोख उत्तर युवक काँग्रेस देईल असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पंकज मोरे व शहर जिल्हा अध्यक्ष निलेश गुहे यांनी दिला.
यावेळी पंकज मोरे, निलेश गुहे, परीक्षित जगताप, फिरोज शाह, समीर जवंजाळ, राहुल येवले, योगेश बुंदेले, रितेश पांडव, अनिकेत ढेंगळे, अंकुश जूनघरे, संकेत कुलट, वसीम कुरेशी, भूषण राऊत, प्रसाद भागत, अभिजित मेश्राम, संदीप शेंडे, मनोज इंगोले,राजू परतेकी, सौरभ किरकटे, आदित्य पेलागडे, हर्षल कालबंडे, आकाश कालबंडे, पंकज शेंडे, शहजादा सौदागर, विनोद सुरुचे, नीरज कोकाटे, शिवानी पाटील, विक्की तायडे, मयूर मेश्राम यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.