भडणे येथे आज भवानी मातेचा यात्रा उत्सव कोरोना महामारीनंतर उत्साहात
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे आज भवानी मातेचा यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोणा मुळे यात्रा भरविण्यात आली नव्हती. यावर्षी सर्वच निर्बंध उठल्याने यात्रा उत्सव भरवण्यात येत आहे. गावापासून एक किलोमीटर अंतरावर टेकडीवर छोटेसे भवानी मातेचेमंदिर आहे. या मंदिरावर गावकऱ्यांची अतूट श्रद्धा आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून, मंदिराचे बांधकाम तसेच रंगकाम केले आहे. नवरात्र उत्सवात या मंदिरावर नऊ दिवस ग्रामस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, सकाळी ग्रामस्थांतर्फे ग्रामदैवत भवानीमातेवर, वाजत गाजत ध्वज व आहेर गावाच्या परंपरेनुसार, भडणे येथील पोलिस पाटील युवराज माळी, यांच्या कडुनमातेला आहेर,चढविला जातो. तसेच लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील, यांच्या हस्ते सकाळी महाआरती पुजा करण्यात आली.
सकाळी पुरोहित राजेंद्र महाराज, यांच्या हस्ते मंत्र उपचाराने विधीवत पूजा करण्यात आली सायंकाळी पाच वाजता तगतराव, मिरवणूक काढण्यात येते परिसरातील भाविक दर्शनासाठी सायंकाळी पाच वाजता सुरुवात गावकरी बाल आबालवृद्ध दर्शनासाठी हजेरी लावतात. यात्रेनिमित्त परिसरातील छोटी व्यवसायिकस्टॉल लावून, लावतात तसेच ग्रामस्थांतर्फे यावर्षी सुकलाल बाबुलाल बोराडी, कर यांचा लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले होते. यात्रा उत्सवासाठी साठी यात्रा कमिटी व ग्रामपंचायत प्रयत्नशील असते.