ग्रामसेविका रेखा खवळे यांची बदली करा ; सरपंच उपसरपंचांसह सदस्यांची मागणी
धारणी (प्रतिनिधी) धारणी पासून १२ की. मी. अंतरावरील पाणखाल्या ग्रामपंचायतच्या सचिव कु. रेखा खवळे यांच्या कार्यप्रणालीवर आरोप करत सरपंच उपसरपंचांसह सदस्यांनी सदर ग्रामसेविकेची त्वरित बदली व्हावी असे निवेदन जि.प. अध्यक्ष बबलू देशमुख यांना देऊन विनंती केली.
पाणखल्या चे सचिव कु. रेखा खवळे ह्या नेहमी सरपंच व इतर सदस्या सोबत अपमानजनक बोलतात व शासनाचा आलेला निधी खर्च करत नसल्याने त्यांना याबाबत सदस्यांनी विचारणा केल्यावर उद्धट उत्तर देतात व याबाबत काही बोलल्यावर महिला असल्याने पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देण्याची धमकी देतं असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच सदर सचिव सतत गैरहजर असतात याबाबत गटविकास अधिकारी यांना कित्येकदा निवेदन दिल्यावर ही त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही. असेही सरपंच संगीता धुर्वे व उपसरपंच मांगीलाल पटोरकर यांनी सांगितले. तक्रार देताना माजी जि प सदस्य श्रीपाल पाल, अंबाडीचे नांदुरकर, सरपंच संगीता धुर्वे, उपसरपंच मांगीलाल पटोरकर, ग्रापं सदस्या रमेश मावसकर, अर्जुन मावसकर, किशन जांबेकर, मनीषा नांदुरकर इत्यादी उपस्थित होते.