शिंदखेडा येथील वसतिगृहासमोर विद्यार्थी पालकांसह आमरण उपोषणाचा तिसरा दिवस
पोलीस निरीक्षक शिदखेडा यांचे वसतिगृहाला पत्र मात्र उपोषण कर्ते ठाम
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील संत गुलाब महाराज आदिवासी मुलांच्या वसतिगृहासमोर वालखेडा येथील अविनाश दिलीप कोळी व हितेश दिलीप कोळी हया दोन्हीही विद्यार्थीचे गेल्या दोन वर्षापासून प्रवेश रद्द करण्यात आला आहे. संबधीत प्रकल्प अधिकारी धुळे यांनी संविधानीक आधार न घेता द्वेष भावनेने प्रकिया केली आहे. याआधी संबंधित सर्व कार्यालयात आधी निवेदन सादर करून पुर्वसुचना देवुन दि.15 मार्च पासून वसतिगृहासमोर विदयार्थी व पालक आई सरलाबाई दिलीप कोळी हे आमरण उपोषणास बसले आहेत. आज तिसरा ददिवस होता. मात्र तिढा काही मिटेना. शेवटी आज शिंदखेडा येथील पोलीस स्टेशन मार्फत पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी प्रकल्प अधिकारी व अधिक्षक वसतिगृह शिंदखेडा यांना पत्र पाठवून संबंधीत आमरण उपोषणाला बसण्याची जागा उघडयावर आहे. तसेच उपोषण करामध्ये एक महिला व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे रात्री अपरात्री अनुचित घटना घडू शकतात.म्हणुन उपोषणास बसलेल्याची समजूत काढून आपल्या स्तरावर मार्ग काढावा असे म्हटले आहे.
दुसर्या दिवशी दुपारी शिंदखेडा तहसीलदार सुनील सैदाणे सह मंडळाधिकारी आर.एच कोळी यांनी उपोषण स्थळी भेट दिल्यावर उपोषणास बसलेल्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत उपोषण मागे घेण्यात यावे असे सांगितले.मात्र जोपर्यंत विदयार्थी ना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत. यावर आम्ही ठाम आहोत.विशेष म्हणजे वसतिगृहाचे जबाबदार अधिकारी व धुळे येथील प्रकल्प अधिकारी यांच्याकडून तीन दिवस उपोषणाला झाले तरी दखल न घेणे व साधी विचारपूस देखील केली नाही. म्हणून अशा झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या अधिकारी वर कठोर कारवाई शासन व्हायला पाहीजे अशी उपोषण कर्ते व पाठिंबा दर्शविणारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मिलिंद पाटोळे व वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नामदेव येळवे यासह अॅड.अरविंद मंगासे तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे.दिवसेदिवस पाठिंबा देण्यासाठी पदाधिकारी ची संख्या वाढत असुन मात्र तालुक्यातील कोळी समाजाचे नेते व पदाधिकारी साधा फोन किंवा भेटायला देखील न आल्याने उपोषण कर्त्यानी कोळी समाजाच्या नेत्यावर रोष व्यक्त केला आहे.