गंगामाता विद्यालयातील मुलां मुलीसाठी राबविण्यात आली कोरोना लसीकरण मोहिम
वरखेडे (गजेंद्र पाटील) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पाश्वभुमीवर नंगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधिकारीच्या मार्गदर्शनाखाली आणि वरखेडे गावाच्या आरोग्य उपकेंद्रामार्फत वरखेडे गावातील गंगामाता विद्यालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात आली.
यावेळी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्याच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर मुलां मुलीना देण्यात येणाऱ्या लसीकरणबाबत सविस्तर माहिती देवून विद्यालयातील १५ वर्ष ते १८ वर्षापर्यत च्या एकुण १७३ मुलां – मुलीना covaxin लस देण्यात आली.
विद्यालयाचे प्राचार्य जे आर पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सी एच ओ विशाखा सेजवळ, आरोग्य सहाय्यक मनोज लांडगे, आरोग्य सेवक दिपक वाघ, आरोग्य सेविका देवका वाघ, जोसना पवार, गट पर्वतक प्रतिभा पाटील, वरखेडे गावातील सर्व आशा वर्कर उपस्थित होते.