आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
युवतीसेना विस्तारक प्रियंका जोशी यांच्यातर्फे लस घेणाऱ्या भेट वस्तु ; युवती सेनेचे आनोखे लसीकरण शिबीर
धुळे (प्रतिनिधी) आज साक्री तालुक्यांतील विविध गावातील शाळांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसदी व युवतीसेना आयोजीत लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागामध्ये लसीकरणा बदल काही गैरसमज आहेत म्हणुन मुल लस घेण्यासाठी पुढाकार घेत नाही पंरतु युवतीसेनेमार्फत लसीकरणाबाबत मुलांनमध्ये जागृती केली. लस घेण्यास येणाऱ्या मुलांना युवतीसेना विस्तारक प्रियंका जोशी यांच्यातर्फे एक भेटवस्तु व मास्क देउन १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस घेण्यास प्रोत्सहीत केले. जनता माध्यमिक विद्यालय, विटाई शाळेला युवतीसेनेमार्फत एक सॅनिटायझर स्टॅन्ड व स्यॅानिटायझर भेट म्हणुन देण्यात आले.



