जळगाव जिल्हा

ट्रक अन् दुचाकीचा भीषण अपघात ; तरुण जागीच ठार

नंदुरबार (प्रतिनिधी) तालुक्यातील रनाळे गावा लगत सोमवारी दुपारी ४ वाजता ट्रक अन् दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात वावद येथील तरूण जागीच ठार झाला.

प्राप्त माहितीनुसार, वावद येथील गोपाल भटु गवळी (वय ४१) हा आपल्या एम. एच. ३९ / अ‍े. अ‍े. ४९१० व्रâमांकाच्या दुचाकीने रनाळेकडे जात होता. यावेळी अचानक रनाळ्याहुन नंदुरबारकडे कापसाने भरलेल्या एम. एच. १८/बी. जी. ७२७७ व्रâमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपाल भटु लगडे या युवकाचा करूण अंत झाला. दरम्यान, घटनास्थळी वावदसह नंदुरबार येथील समाज बांधवांनी धाव घेतली.

रनाळेसह जिल्हा रूग्णालय येथील रूग्णवाहिकेशी वारंवार संपर्क करून देखील उशिरापर्यत रूग्णवाहिका उपलब्ध झाली नव्हती. यामुळे वावद ग्रामस्थांसह उपस्थित नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. गोपाल लगडे यांच्या पश्चात आई, वडिल, काका, काकु, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, असा परिवार आहे. नंदुरबार येथील मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचारी भटु गवळी यांचा तो सुपूत्र होता.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे