महाराष्ट्र
तहसीलदार, प्रांत कार्यालयासाठी लवकरच सुसज्ज इमारत
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री ना. पवारांचा निर्णय
सातारा (प्रतिनिधी) प्रांताधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय सातारा ही दोन्ही कार्यालये पोवई नाक्याजवळ एकाच परिसरात पूर्वापारपासून कार्यरत आहेत. त्याच आवारात महसूल विभागाशी संलग्न अन्य शासकीय कार्यालये, सेतू कार्यालय असून याठिकाणी जागेच्या कमतरतेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयासह इतर सर्वच कार्यालयांसाठी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारावी, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.