चिंचपाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व जयपालसिंग मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी
चिंचपाडा (प्रतिनिधी) आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व जयपालसिंग मुंडा यांची जयंती ग्रा.पं.बोदगांव अंतर्गत चिंचपाडा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच लहान बालिकांनी सावित्रीबाई यांची वेशभुषा साकारली असल्याने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यानंतर कोविड लसिकरणातील दुसरा डोस घेणेसाठी आलेल्या ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले.
तसेच वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी त्यांच्या पालकांकडे जाऊन जनजागृती करण्यात यावी, असे ग्रामपंचायतीद्वारे सुचविले असता त्यास आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी या सर्व ग्रामस्तरीय विभागांनी सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी उपस्थित सन्मा.पं.स. सदस्य मैदाणे गण संगिता गणेश गावित, महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियान समिती प्रमुख गणेश गावित, भरत ठाकरे, शाखाध्यक्ष पंकज हिराजी पगारे ग्रामसेवक, आरोग्य सेविका- जे.डी.गवळी, आरोग्य सेविका -ए.एस.बहिरम, आरोग्य सेवक- के.वाय.कुलकर्णी, सिंधुबाई अहिरे (मुख्याध्यापक), आर.एम.ठाकरे (उपशिक्षक), कमलबाई भोये (अंगणवाडी सेविका), काळीबाई पवार (मदतनीस), सुनिता कामडे (आशा), बन्सिलाल गायकवाड (पोलिस पाटिल), ज्योतिराव बहिरम, रघुनाथ धनगर, अरुण भारुड (ग्रा.पं.कर्मचारी) संजय पवार, हिराबाई गावित, लक्ष्मी गावित, सरिता गावित, सुनंदा गावित आदी उपस्थित होते.