वैजापूर तालुक्यातील कांगोणी भवूर गावामध्ये स्वस्त धान्य दुकानात होते तीस दिवस धान्य वाटप .
दिनांक – १० आँगस्ट २०२२
वैजापुर प्रतिनिधि- गहनीनाथ वाघ
तालुक्यातील कांगोणी व भवूर येथील नागरिकांनी दिली माहिती या दोन्ही स्वस्त धान्य दुकानदार कैलास रंगनाथ काळे हे धन्य वाटत असताना कोणत्याही राशन धारकाला धान्य मिळाले पाहिजे याची काळजी घेतात कैलास काळे यांच्या कांगोणी गावातील स्वस्त धान्य दुकान नंबर २२६ मध्ये एकूण १३ क्विंटल गहू ८ क्विंटल तांदूळ धान्य मिळते तसेच भवूर गावातील दुकान नंबर २२४ मध्ये २२ क्विंटल गहू १४ क्विंटल तांदूळ व तसेच प्रत्येक माणसाला ३ किलो गहू २ किलो तांदूळ दिले जाते असे एकूण एका व्यक्तीला पाच किलो धान्य दिले जाते.
राशन धारक दत्तू काळे म्हटले की पहिले मला बारा किलो धान्य मिळत होते यांच्याकडे धान्य घेण्यासाठी आल्यापासून २५ किलो धान्य माझ्या राशन कार्ड वरती मिळते व पोलीस पाटील अशोक भिकाजी त्रिभुवन यांनी काळे यांचे आभार करत की खरंच संपूर्ण राशन धारकांना राशन मिळते व तालुक्यातील एकमेव असे दुकान आहे की धान्य घेतल्यानंतर त्यांना घेतलेल्या मालाची पावती दिली जाते व हे दुकान सकाळी सात ते दहा पर्यंत ३० ही दिवस चालू असते कांगोणी गावासाठी ७ ते १५ तारखेमध्ये धान्य वाटप होते व भवूर १६ ते २५ तारखेमध्ये गावातील नागरिकांना धान्य वाटप केली जाते असे पोलीस पाटील अशोक भिकाजी त्रिभुवन बोललेत.