माजी मंत्री यांच्या घरी लागलेली शिक्षकांची नवी-कोरी मोटरसायकल झाली चोरी
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पहिली मोटरसायकल चोरीची ताजी घटना
दोंडाईचा (प्रतिनिधी) येथे आज परत नवीन २०२२ वर्षाच्या पहिल्या आठवड्यात माजी मंत्री यांच्या घरी कामानिमित्त आलेल्या शिक्षकाची नवी-कोरी हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटरसायकल दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेने नुतन वर्षाची सुरूवात चोरांनी माजी कायदा मंत्र्यांच्या घरापासुन केली असुन, त्यामुळे मागील वर्ष तर लोकांचे चोरींच्या घटनेबाबत खराब होते.
म्हणून यावर्षी चोरी झालेल्या मोटरसायकली व चोरांचा तपास पोलीस लावतील का? नाही. नेहमी जनतेला जीव मुठीत घेऊन ह्या प्रकारच्या आर्थिक हानींचा त्रास रोजच सहन करावा लागेल, असा प्रश्न गावातील सज्ञान जनतेला पडला आहे. म्हणून स्थानिक पोलीसांनी आतातरी चोरीच्या घटना थांबतील असे जनतेला ठोस आश्वासित करणाऱ्या- म्हणजे चोरी गेलेल्या मोटरसायकली परत मिळवून चोरांवर अंकुश मिळवायला हवा, अशी अपेक्षा गावातील जाणकार-सज्ञान नागरिक स्थानिक पोलीस विभागाकडून करत आहे.
आज दिनांक ३ जानेवारी २०२२ सोमवार रोजी संध्याकाळी माजी मंत्री व ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे चेअरमन डॉ. हेमंतराव देशमुख यांच्या घरी कामानिमित्त संस्थेतील कर्मचारी शिक्षक संदीप दामू पाटील राहणार विखरण देवाचे हे आले असता त्यांनी आपली हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स मोटरसायकल सायकल क्रमांक एम.एच.१८-बी.एस.-०३५५ ही गाडी गेटजवळ लावून आत प्रवेश केला व चेअरमनांशी फक्त दहा मिनीटे वार्तालाप करून, तेवढ्यात ते घरी जाण्यासाठी निघाले असता. त्यांना गेटजवळ लावलेली त्यांची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम.एच.१८- बी.एस.-०३५५ ही दिसुन आली नाही. त्यांनी तिचा इतरत्र शोध घेतला तरी मिळून आली नाही. म्हणून काल रात्री उशीरापर्यंत त्यांनी दोंडाईचा पोलीस स्थानकात मोटरसायकल हरविल्याबाबत तक्रार दिली आहे.
सध्या शहरात मागील वर्षीपर्यंत चोरांनी धुमाकूळ घातला होता व आता नुकतेच सुरू झालेल्या नवीन २०२२ वर्षात माजी कायदा मंत्री यांच्या घरापासुन चोरीच्या घटनांना सुरूवात झाली आहे. म्हणून अगोदरच व्यापारी व सर्वसामान्य नागरिक तर ह्या रोज उठून चोरीच्या घटनांनपासुन वैतागून गेले होते.आता त्यात माजी कायदा मंत्री व संस्थाचालक यांचे घर ही दिवसा सुरक्षीत नसेल. तर इतर सर्वसामान्य माणसांनी दैनदिन कामेधंदे करून जगायचे कसे? व वस्तुंची सुरक्षा करायची कशी? असा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे. म्हणजे जर चोर प्रत्येकाच्या घर-दुकानापुढे येऊन दिवसाढवळ्या चोरीला लक्ष करत असतील तर नागरिकांनी पोटापाण्यासाठी कमवायचे का ? पोलीस विभाग गावात कर्तव्यावर कार्यरत असल्यावर,आपल्या वस्तुंवर स्वतः सुरक्षा पुरवायची? अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून स्थानिक पोलीस विभागाने गावात मागील वर्षात व आता चोरी झालेल्या घटनांचा छडा लावून, लोकांच्या चोरी झालेल्या वस्तु परत मिळवून द्यायला हव्या, तरच जनतेचा विश्वास पोलीस विभागावर राहील, असे दबक्या आवाजात चोरीच्या घटना ज्यांच्या सोबत झाल्या आहेत. त्यांच्या तोंडून निघत आहे.म्हणून येणाऱ्या नवीन वर्षात पाहू पोलीस विभाग खंरच जनतेच्या जान-मालची सुरक्षा-काळजी घेते का?जसा त्रास चोरांपासुन चालू आहे. तसाच त्रास पुन्हा यावर्षी ही सहन करावा लागेल, असे जनमत तयार होत आहे.