सोयगाव : केंद्रीय रेल्वे,कोळसा,खनिक. मंत्री रावसाहेब पाटिल-दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ७ नोव्हेबर पासून सोयगाव भाजपा तालुका अध्यक्ष गणेश पाटिल-लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली फर्दापुर सर्कल मध्ये प्रत्येक गावात गाव गाव चलो घर घर चलो अभियान राबविल्या जात आहे या अभिनव उपक्रमाच लोक स्वागत करित आहे दरम्यान भाजपा तालुका अध्यक्ष व सर्व भाजपा पदाधिकारी,लोकप्रतिनिधि,बुथप्रमुख,शक्तिकेन्द्र प्रमुख,पन्नाप्रमुख,व कार्यकर्ते प्रत्येक घर घर जाउन लोकांच्या समस्या जाणून घेऊन स्वतःव भाजपा नेत्यांच्या वतीने समस्यांच निराकरण करण्यासाठी झटत आहेत दरम्यान दि.१३ रोजी सावळदबारा, महालब्दा,पिंपळवाडी गवातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या,यावेळी भाजपा आदिवासी मोर्चा ता.अध्यक्ष शेरिफ तडवी,किसान आघाडी जिल्हा सचिव दारासिंग राठोड,किसान आघाडी जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रभाकर बंडे,अनुसूचित आघाडी ता. अध्यक्ष शांताराम खराटे ,युवा नेते मनोज बुढाळ,बुथप्रमुख ईश्वर कोळपे,सरपंच भाऊराव कोलते,बेला आप्पा पंधाडे,समाधान गायकवाड,विश्वास सपकाळ, हरिदास चोतमल,भागवत देवकर,संपत सुरडकर,गणेश सपकाळ,अक्षय सपकाळ,अनिल करहाले, गणपत सूर्यवंशी,
आदीसह उपस्थित होते.