महाराष्ट्र
रोहोड येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन
रोहोड (प्रतिनिधी) येथील शासकीय आश्रम रोहोड येथे प्रकल्प कार्यालय धुळे आयोजित तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले. त्या स्पर्धेच उदघाट्न साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा पंकज सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोहोड चे माजी सरपंच हिम्मत साबळे, भास्कर राऊत, रमेश सूर्यवंशी, पंकज सूर्यवंशी, पोलीस पाटील संजय साबळे, मैदाणे सरपंच कैलास ठाकरे, रोहोड आश्रमचे मुख्याध्यापक वाघ, शिरसोले आश्रमचे भैय्या खैरनार, साक्री तालुक्यातील सर्व आश्रम शाळेचे मुख्याधापक व शिक्षक वृंद व कर्मचारी व खेळाडू उपस्थिती होते.



