अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास तलाठी, पोलीस पाटील यांच्यावर कारवाई
धुळे (करण ठाकरे) गावात महापुरुषांचा अनधिकृत पुतळा उभारल्याची माहिती प्रशासनाला देण्यास विलंब केला तर गावातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटीलसह कोतवालावर कारवाई केली जाणार आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी त्याबाबत शनिवारी परिपत्रक काढले आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी शासनाची पूर्वपरवानगी न घेता महापुरूषांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शासनाच्या परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणतेही स्मारक अथवा महापुरुषांचा पुतळा उभारता येत नाही. त्यामुळे गावपातळीवर काम करणारे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांनी त्यांच्या कार्यकक्षेतअनाधिकृत पुतळा उभारणाऱ्यांना परावृत्त करावे. तसेचतहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला ताबडतोब माहिती द्यावी अशा सुचना परिपत्रकात करण्यात आल्या आहेत… ज्या गावांमध्ये विना परवानगी पुतळा उभारण्याच्या हालचाली निदर्शनास आल्यानंतरही मंडळ अधिकारी तलाठी इतर व कर्मचाऱ्यांनी त्याबाबतप्रशासनास कळविण्यास विलंब अशा सुचना केल्यास त्यांना व्यक्तीशः जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पुतळ्यांचे पावित्र्य भंग प्रतिबंध अधिनियम १९७ व महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम १६७ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.