मांडळ येथे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (आबा) भामरे चौथ नदीवरील यांच्या हस्ते भुमिपुजन
मालपुर (गोपाल कोळी) जिल्हा परिषद अंतर्गत मांडळ येथे चौथ नदीवरील साठवण बंधारा दुरुस्ती क्रमांक २ चा जिल्हा परिषद सदस्य आबासाहेब ज्ञानेश्वर भामरे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडुन कामाची सुरुवात करण्यात आली.
या वेळेस दिपक पाटील पंचायत समिती सदस्य कैलास आखाडे, मा.ग्रा.पं सदस्य राजु पवार, जगन बागुल, किशोर पवार, हेमंत पाटील, भैय्या देवरे, जयेश देवरे, उदय पवार, गणेश मोरे
तसेच या कामाचे ठेकेदार धुळे येथील इंजिनिअर मोजमाप करून कामाची माहिती दिली.
या वेळेस आबासाहेब भामरे यांनी सांगितले की, मांडळ व अंजनविहिरे या गावांनी मला भरभरून मतांच्या पेटीतुन आशिर्वाद दिला आहे. म्हणुन मी या गावाच्या विकास काम करून ऋण फेडण्याच्या प्रयत्न करीत आहे. व त्यांच्या पुढे देखील करत राहिलं तसेच या पुढील सर्व कामांवर ती मी जातीने लक्ष ठेवून काम पूर्ण करून घेणार व मी मंजूर केलेले कामावरती स्वता श्रीफळ फोडण्यासाठी उपस्थित राहिल. अशी त्यांनी ग्वाही दिली.