तामिळनाडूत विद्यार्थिनीने दबावापोटी आत्महत्या केल्याचा अभाविपचा आरोप
धुळे (करण ठाकरे) तामिळनाडूतील एका ख्रिश्चन मिशनरींच्या शिक्षण संस्थेतील लावण्या या विद्यार्थिनीवर धर्मातर करण्याबाबत दबाव टाकण्यात येत होता. या दबावातून लावण्याने आत्महत्या केली असा आरोप करत या घटनेचा निषेध आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील शिवतिर्थ चौकात निषेध आंदोलन केले. तामिळनाडूतील एका ख्रिश्चन मिशनरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या लावण्या या विद्यार्थीने केलेली नाही. ख्रिश्चन धर्मात धर्मातर करावे यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या दबावातून लावण्याला आत्महत्या करावी लागली, असा आरोप होत आहे. ही संस्थात्मक हत्या भारतीय संविधान आणि लोकशाहीला काळीमा फासणारी असून अशा धार्मिकउन्मादामुळे असंख्य निष्पापांना आपले प्राण गमवावे लागत आहे. परंतु अद्यापही तेथील सरकारने अपराध्यांवर कोणतीही कारवाई
आत्महत्या करण्यास भाग पाडलेल्या लावण्याला न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाटी व ३३ कार्यकर्त्यांना चेन्नई येथे शांततापूर्वक आंदोलन करत असताना तेथील सरकारने अटक केली. याकृत्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जाहीर निषेध करीत आहेत. जोपर्यंत लावण्याला न्याय मिळत नाही. तोपर्यंत विद्यार्थी परिषदेचा संघर्ष सुरुच राहिल, असा इशाराही परिषदेचे देवगिरी प्रांत महमंत्री भावेश भदाणे, वैभवी धिवरे, राजेंद्र पाटील, उदय महाजन, योगेश कोळवले, मयूर साकोरकर, हर्षल पिंगळे, चेतन बडगुजर, हर्ष अग्रवाल, ओमकार प्रजापत, भावेश जाधव आदींनी दिला आहे