२६ नोव्हेंबर..भारतीय संविधान दिन डोंबिवली येथे मनसे कडून साजरा
डोंबिवली : आज भारतीय संविधान दिना निमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, परमपुज्य डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोंबिवली पुर्वे येथील विभागीय कार्यालया जवळील पुर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरातर्फे शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले.यावेळी श्री.रतन संसारे व श्री सुर्यकांत पारधे यांच्या वतीने मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली.
तसेच २००८ साली २६/११ रोजी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना व मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना अभिवादन करण्यासाठी भाजपा डोंबिवली युवा मोर्चा तर्फे अभिवादनाच्या कार्यक्रमात मनसे डोंबिवली शहराच्या वतीने सहभागी होऊन सर्व शहीदांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत,जिल्हा संघटक सुदेश चुडनाईक,शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे, शहर सचिव अरुण जांभळे,दिपक शिंदे,विभागअध्यक्ष रक्षीत गायकर, उपविभाग अध्यक्ष विवेक भणगे,अतुल जाधव, शाखा अध्यक्ष गणेश कदम, रवि गरुड,प्रतिक रुपवते,रस्ते आस्थापना शहर संघटक ओम लोके, महिला सेना शहर संघटक स्मिता भणगे, सुमेधा थत्ते,प्रतिभा पाटील याप्रसंगी डोंबिवली मनसेचे पुरुष, महिला पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
मनोज प्रकाश घरत
शहरअध्यक्ष,मनसे,डोंबिवली शहर