महाराष्ट्रराजकीय

खेला होबे.. गोव्याच्या राजकारणातील मोठी बातमी! दीदींचे भाजपला अवघ्या ५ तासांत दोन धक्के!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गोव्यामध्ये भाजपला सकाळपासून लागोपाठ दुसरा मोठा झटका लागला आहे. भाजपचे मायेमचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी राजीनामा दिला आहे. प्रवीण झांट्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच सामील होण्याची शक्यता आहे. याआधी गोव्यातील भाजपचे कळंगुटमधील आमदार आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी राजीनामा दिला आहे. लोबो यांनी आमदार आणि मंत्रीपदाचाही राजीनामा दिला आहे. सोमवारी सकाळी आपला मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. तर यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांना आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. भाजपने बंगाल विधानसभेत टीएमसीसोबत जे केलं त्याचा वचपा टीएमसी काढतेय का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ममतांची खेळी?

याबाबतची माहिती देताना प्रवीण झांट्ये म्हणाले, की आतापर्यंत पक्षाने जी कामं दिली ती मी केली. गोव्यात 12 ते 14 मतदारसंघ खाणक्षेत्रात येतात. यात अनेक खाणी बंद झाल्याने लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. 2012 पासून येथील लोकं बेरोजगार आहेत. सुप्रीम कोर्टानेही खाणी चालू करण्यास सांगितले. मात्र, सरकारने याबद्दल पुढाकार घेतला नाही. याबद्दल मी वारंवार मुद्दा उपस्थित करुनही यावर काहीच हालचाल झाली नाही. दरम्यान, प्रवीण झांट्ये आता टीएमसीमध्ये दाखल होणार असल्याचे बोबले जात आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने टीमएमसीच अनेक आमदार फोडून आपल्या पक्षात घेतले होते. आता भाजपचे आमदार टीएमसीमध्ये दाखल होत असल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपला छोबीपछाड देत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मायकल लोबोंनी का दिला राजीनामा

लोबो म्हणाले, की ‘मी गोवा मंत्रिमंडळ आणि आमदार या दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे. गोवा भाजप मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेताना मला दिसत नाही, ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांना भाजपने बाजूला केलं आहे’

मायकल लोबो आता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून लोबो यांनी सरकारवर नाराजी दाखवत आरोप करण्यास सुरुवात केली होती. यामुळे ते बरेच चर्चेत होते . मायकल लोबो हे 2005 साली भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांनी 2012 साली भाजपकडून निवडणूक लढवली होती. ते सगल दोन वेळा आमदार झाले. गेल्यावर्षी त्यांना ग्रामीण विकास व घनकचरा व्यवस्थापन मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. मात्र, आता त्यांनी मंत्रीपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मी गोव्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कळंगुट मतदारसंघातील लोक माझ्या निर्णयाचा आदर करतील अशी आशा आहे. पुढे काय पाऊल टाकायचे ते बघू. इतर पक्षांशी चर्चा सुरु आहे, असं मायकल लोबो यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे