नाशिक परीक्षेत्राचे पोलीस विशेष महानिरीक्षक डाॕ. बी जी शेखर यांनी घेतली धर्मगुरु समवेत शांतता समिती बैठक
धुळे (प्रतिनिधी) धुळ्यात पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने विशेष पोलीस उपमहानिरीक्षक डाॕ बी. जी. शेखर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील चिंतन हॉल येथे सर्व धर्मीय धर्मगुरूंची शांतता समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध धर्मच्या धर्मगुरूंनी विविध सूचना या बैठकीत मांडल्या.
शहरात शांतता व सलोखा टिकून राहण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातील सद्य स्तिथी व शहराच्या भल्यासाठी उपाय काढण्याच्या सूचना या बैठकीतून करण्यात आल्या. काहींनी पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व सूचना ऐकून घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन पोलीस अधिकऱ्यांनी बैठकीत केले आहे.
‘पोलिसांसोबत प्रेमाने वागा ते तुमचा आदरच करतील मात्र बेजबाबदार वागाल तर कायदेशीर कारवाई करणारच’, असे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी म्हंटले आहे. तसेच ‘नाशिक परीक्षेत्रात नशा मुक्ती अभियान राबवत असून त्या माध्यमातून साडे तीन कोटी रुपयाचा माल देखिल हस्तगत केला आहे. त्यात दोषी असलेल्या पोलीसांवर देखील कारवाई केली असल्याचे ते म्हणाले. जातीय सलोख्याचे धुळे पॅटर्न खूप चांगले आहे. ते महाराष्ट्रात राबविण्यात यावे’, अशी इच्छा यावेळी पोलीस महानिरीक्षक यांनी व्यक्त केले. चुकीचे काम करणाऱ्या पोलिसांना सोडणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागिय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे, हिंदू धर्माचे सोमनाथ गुरव, मुस्लिम धर्माचे मोलवी शकील, शवाल अन्सारी, शीख धर्माचे बाबा धीरज सिंग, ख्रिश्चन धर्माचे फादर विल्यम रोड्रीग्स, एम जी धिवरे जिभाऊ, रिपब्लिकन पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक दामोदर, माजी आ. शरद पाटील, संजय शर्मा, मुकुंद कोळवले, माजी उपमहापौर सवाल अन्सारी, यांच्या सह सर्वच पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक, पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.
शांतता समितीचे सुत्रसंचालन जेष्ठ पत्रकार यशवंतजी हरणे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाॕ बी जी शेखर यांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तेव्हा वरखेडे गावाचे पत्रकार गजेंद्र नारायण पाटील यांनी सुध्दा पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.



