महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ धुळे व नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ व हस्ती पब्लिक स्कूल आणि जूनियर कॉलेज दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा पुरस्काराचे वितरण संपन्न
तळोदा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ धुळे व नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ व हस्ती पब्लिक स्कूल आणि जूनियर कॉलेज दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय राज्यस्तरीय आदर्श स्त्री क्रीडा शिक्षक क्रीडा, संघटक व क्रीडा पत्रकार पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम २० मार्च रोजी पार पडला असून यावेळी अर्जुन पुरस्कार सोहळ्याचे उदघाटन काका पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक संचालनालय पुणे संचालक चंद्रकांत कांबळे उपस्थित हे उपस्थित होते.
त्याचबरोबर देविदास गोरे, अशोक दुधारे, अशोक जैन, सुनंदा पाटील, उपसंचालक नाशिक आसाराम जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे धनंजय जमादार, क्रीडा महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, डॉ. बलवंत सिंह, प्रदीप तळवलकर, रवींद्र निकम, महेंद्र राजपूत या मान्यवरांच्या उपस्थित हस्ती बहुद्देशीय संस्कृतिक भवन कोठारी पार्क येथे सकाळी दहा वाजता ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
राज्यस्तरीय आदर्श हस्ती क्रिडा शिक्षक पुरस्कार २०२० गुणवंत बेलखेडे ठाणे, हॉलीबॉलविक्रम सांडसे उस्मानाबाद, क्रिकेट सुनिल शिंदे लातूर, बॉल बँडमींटन दिलीप पवार भंडारा, राजेश शहा नंदुरबार, रोल बॉल गणेश माळवे परभणी, टेनिस हॉलीबॉल गिरीराज गुप्ता यवतमाळ, थ्रोबॉल मनोज पाटील धुळे, अँथलेटिक्स श्रीमंत कोकरे सातारा, तायक्वांदो सुनिल शेंडे गोंदिया, वुशु श्रीकांत देशमुख अमरावती, सेपक टकरा सचिन सुर्यवंशी जळगाव, हॉलीबॉल कपिल ठाकूर वर्धा, हॉलीबॉल सुनिता नाईक कोल्हापूर, डॉजबॉल संजय मैद अकोला, कब्बडी मनोहर टेमकर रायगड, कब्बडी आशिष कान्हेड औरंगाबाद, मनोजकुमार पाटील सोलापूर, कब्बडी सुधिर बुटे नागपूर, हँडबोल परशुराम लोंढे सांगली, अँथलेटिक्स विनोद मयेकर रत्नागिरी, रमेश बाह्मणे पुणे, हॉलीबॉल विध्यादेवी घोरपडे अहमदनगर, फुटबॉल आकाश पाटील मुंबई, खो खो सोमनाथ गोंधळी सिंधदुर्ग,इत्यादी मान्यवरांना वितरित करण्यात आले.
राज्यस्तरीय आदर्श हस्ती क्रिडा गौरव पुरस्कार २०२० अमृत बिऱ्हाडे औरंगाबाद, बास्केटबॉल शिवाजी नागरे चंद्रपूर, अँथलेटिक्स दिलीप लांडकर बुलढाणा, अँथलेटिक्स शाम वानखेडे वाशिम, कब्बडी लिलाधर बडवाईक गडचिरोली, खो. खो. राज्यस्तरीय आदर्श हस्ती क्रिडा पत्रकारिता पुरस्कार मिलिंद पाटील जळगाव, अविनाश ओंबासे ठाणे .यांना वितरित झाले. तर राज्यस्तरीय आदर्श हस्ती क्रिडा शिक्षक पुरस्कार २०२० निवृत्ती लांडगे नाशिक, खो. खो. यांना देण्यात आले. राज्यस्तरीय आदर्श हस्ती क्रिडा संघटक पुरस्कार २०२० डी बी सांळूखे धुळे यांना देण्यात आला.
नंदुरबार जिल्हा जिल्हास्तरीय आदर्श हस्ती क्रीडा शिक्षक योगेश बेदरकर नंदुरबार, जिमेस्टिक शांताराम मंडळे नंदूरबार, मल्लखांम दत्तात्रय सुर्यवंशी अक्कलकुवा, खो. खो.किशोर परदेशी तळोदा, युवराज पाटील शहादा, क्रिकेट हरीश पाटील नवापूर, खो .खो. मनोज पाटील नवापूर, अँथलेटिक्स जिल्हास्तरीय आदर्श हस्ती क्रीडा संघटक पुरस्कार सतिष सदाराव नंदुरबार, रविंद्र सोनवणे नंदुरबार. जिल्हास्तरीय आदर्श हस्ती क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार दिनेश बैसाने नंदुरबार टेबल टेनिस यांना देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला पुरस्कारार्थी,अनेक मान्यवर, क्रिडा प्रेमी यांनी आवर्जून आपली उपस्थिती दर्शविली.