दोंडाईचा येथील घोडके परिवाराने आईंला दिली आगळी वेगळी श्रद्धांजली
परिवारातल्या नऊ व्यक्तिंनी केलं रक्तदान!
दोंडाईचा (प्रतिनिधी) वि.प्र. उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दि हस्ती को. ऑप. बँकेच्या ५० वा वर्धापन दिन निमित्त हस्ती बँक व लायन्स क्लब दोंडाईचा तर्फे दिनांक ९ जानेवारी २०२२ रविवार रोजी हस्ती प्रि – प्रायमरी स्कूल काराणी ज्ञानदीप इमारत, स्टेशन भाग दोंडाईचा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबीरात दोंडाईचा येथील घोडके परिवारातील नऊ सदस्यांनी रक्तदान करून आईंना आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली.
याबाबत वृत्त असे की, स्व. मिनाक्षी आई घोडके यांचे दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. स्व. मिनाक्षी आईंच्या दशक्रिया, उत्तर कार्य व धार्मिक विधी करिता गावातील व बाहेरगावातील घोडके परिवार एकत्र आला होता. याप्रसंगी परिवारातील सदस्यांनी हस्ती बँक व लायन्स क्लब द्वारा आयोजित रक्तदान शिबीरात उपस्थित राहून रक्तदान करून स्व. मिनाक्षी आईंना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली! यात स्व. मिनाक्षी घोडके यांचा मुलगा – गजेंद्र घोडके, सून – शितल घोडके, नातू – पार्थ घोडके, पुतण्या – दिपक घोडके, सून – ललिता घोडके, नातू – गौरव घोडके, मुलगी – समीता भामरे, जावई – गोविंद रमाकांत छाईलकर, नातू – पंकज जगताप; अशा एकच परिवारातील नऊ सदस्यांनी समाजऋणांची परतफेड व्हावी या भावनेपोटी रक्तदान करून आगळी वेगळी श्रद्धांजली समर्पित केली. असा सामाजिक दायित्वाचा आदर्श प्रत्येकाने गिरवण्याचं सुरू केलं तर एक मोठी सामाजिक चळवळ उभी राहील व अनेक लोकांचे प्राण वाचतील.



