शिरीष कुमार मंडळातर्फे जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त अभिवादन
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील बालवीर चौक परिसरात बुधवारी राजमाता जिजाऊसाहेब यांच्या ४२४ व्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या १५९ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी दिव्या गवळी या विद्यार्थिनीच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांनी पुष्पहार अर्पण केले.
यावेळी जागृती गवळी हिने विश्वमाता, राष्ट्रमाता, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ साहेब यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच हिंदुत्वाची पताका सातासमुद्रापार पोहोचविणारे राष्ट्र युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची ओळख जी.एस. गवळी यांनी करून दिली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांचे पालकांनी लसीकरण करून घ्यावे तसेच सामाजिक अंतर ठेवून मास्क वापरणे बाबत आवाहन केले. अभिवादन कार्यक्रमास आस्था गवळी, दिव्या गवळी, ज्योती गवळी, पायल गवळी, गुंजन गवळी, रीना गवळी, यामिनी गवळी, हर्शिका गवळी, वंशिका गवळी, चैताली हिरणवाळे, वैशाली कुंभार, गायत्री चौधरी, नम्रता तांबे, पूजा तांबे, नेहा सुर्यवंशी तसेच राम गवळी, प्रणव गवळी, सचिन गोडळकर, कृष्णा चौधरी आदी शालेय विद्यार्थी उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे डॉ.गणेश ढोले, विशाल हिरणवाळे यांनी केले.