महाराष्ट्र
शेलापुर खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच सचिव आर्थिक व्यवहारापोटी सरकारी झाडांची अैवध कत्तल
मोताळा (मिलींद बोदडे) मोताळा तालुक्यातील शेलापुर खुर्द ग्रामपंचायतचे सचिव व सरपंच यांनी आर्थीक व्यवहारापोटी सरकारी झाडांची अैवध कत्तल करुन विकण्यात आले आहे आपली स्वताची तिजोरी भरण्याच काम सरपंच सचीव यांनी केल आहे.
सरकारी झाडांची कत्तल करत असतांना वनविभागाचे कर्मचारी सुध्दा झाडांची कत्तल करणार्या लोकांकडुन आपला हप्ता घेऊन मोकळे होतात. म्हणून मोताळा तालुक्यात झाडांची कत्तल करणार्या लोकांची संख्या जास्त झाली आहे. झाडांची कत्तल करणारे जोमात तर वनविभाग कोमात अशी परिस्थीती मोताळा तालुक्यात निर्माण झाली आहे. शेलापुर खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच व सचीव तसेच वनविभागाचे कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही झाली पाहीजे अशी शेलापुर ग्रामस्थाची मागणी आहे.