महाराष्ट्र
श्री साई बाबा मंदिरात ग.भा. दगडाबाई खरात यांच्या हस्ते साईबाबा चरणी फराळसेवा अर्पण
बोदवड (सतीष बाविस्कर) दर गुरुवारी दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसाद श्री साई बाबा मंदिर येवती जामठी बोदवड रोडवर पंचक्रोशित ग्रामस्थ यांच्या सहकार्याने साईबाबांची आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. आज गुरवार रोजी एकादशीनिमित्त फराळाचा महाप्रसाद देण्यात आला. यावेळी ग.भा. दगडाबाई काशीराम खरात यांनी ही फराळसेवा साईबाबा चरणी अर्पण केली.
ग.भा. दगडाबाई काशीराम खरात यांचा श्री साईबाबा सस्थांन व साईबाबा ऊत्सव समितीच्या वतीने कल्पनाताई प्रमोद पवार यांच्या हस्ते साईबाबा प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. याठिकाणी आपल्या इच्छेनुसार दर गुरुवारी साईबाबा चरणी महाआरती व महाप्रसाद सेवा दिली जाते. या ठिकाणी ज्यांना सेवा द्यायची आहे. त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करावी. तसेच नवीन वर्ष २०२२ ची नोंदणी करणे चालू आहे.